

Pranita Kulkarni Arguing With Voter
ESakal
बदलापूर : बॅरेज रोड येथील प्रभाग क्रमांक ११ (अ) मधून विजयी झालेल्या भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावरून तीव्र चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये कुलकर्णी या एका मतदाराशी वाद घालताना दिसत आहेत. मतदानाला जायचंच नव्हतं तर पैसे का घेतले? अशा आशयाचा व्हिडिओ असल्याचे दाखवत चित्रण आहे. तसेच आम्ही काय तुमची घरं भरायची का? असे उद्गारही त्या व्यक्त करताना दिसतात.