

Sonography Scam
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहात सोनोग्राफीच्या नावाखाली गर्भवती महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका तथा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.