Thane News: घोडबंदरमध्ये नवीन बांधकामाला विरोध, पाणीटंचाईवरून भाजप आक्रमक

Ghodbunder Water Scarcity : पाणीटंचाईवरून घोडबंदरमध्ये नवीन बांधकामाला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी नागरिकांचे हित जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
Ghodbunder Water Scarcity

Ghodbunder Water Scarcity

ESakal

Updated on

​ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेता, महापालिकेने या भागात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना आणि इमारतींच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी आक्रमक मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले असून, सद्यस्थितीत राहणाऱ्या नागरिकांचे हित जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com