महाड ग्रामीण रुग्णालयात कोविड केंद्राच्या दुरुस्तीसाठी शासनाने तातडीने निधी द्यावा, भाजपची मागणी

महाड ग्रामीण रुग्णालयात कोविड केंद्राच्या दुरुस्तीसाठी शासनाने तातडीने निधी द्यावा, भाजपची मागणी

मुंबईः  महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड केंद्र म्हणून वापरण्यासाठी सरकारने तातडीने दुरुस्ती निधी द्यावा, तसेच महाड इमारत दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांचे पुनर्वसन सरकारने तातडीने करावे, अशा मागण्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्या आहेत. 

या मागण्यांसंदर्भात दरेकर यांनी सोमवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय  वडेट्टीवार यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी वरील मागण्यांचे निवेदन सादर केले. 

महाड तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या वाढते आहे, या रुग्णांना इतरत्र घेऊन जाण्याऐवजी त्यांची व्यवस्था महाड मध्येच होऊ शकते. महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड केंद्र म्हणून वापरता येईल. मात्र त्यासाठी तिची दुरुस्ती करणे जरुरी आहे, त्यासाठी शासनाने त्वरीत विशेष निधी मंजूर केल्यासच हे शक्य आहे. नेहमीच्या पद्धतीत दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच शासनाने तातडीने निधी देऊन दुरुस्ती करावी आणि येथे कोविड केंद्र सुरु करावे, असे दरेकर यांचे म्हणणे आहे. 

पुनर्वसन सरकारने करावे

मागील महिन्यात कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीमधील कुटुंबांचे पुनर्वसनही सरकारने करावे, अशी मागणीही दरेकर यांनी या पत्राद्वारे  केली आहे. या दुर्घटनेची शासनामार्फत चौकशी सुरु आहे आणि त्यासंदर्भात कारवाई देखील सुरु झाली आहे. मात्र येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महत्वाचा आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. 

24 ऑगस्टला झालेल्या या दुर्घटनेत जीवितहानी झाली तसेच त्यातील 47 कुटुंबे बेघर झाली आहेत. इमारत पडल्यामुळे आता नवे घर बांधण्याची क्षमता या बेघर झालेल्या लोकांची नाही. त्यामुळे शासनानेच त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BJP demands immediate release of funds repair of Covid Center Mahad Rural Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com