लॉकडाऊनमुळे लोकल पास बुडाला? चिंता करू नका... होऊ शकतो हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांच्या मासिक पासच्या कालावधीत वाढ करावी किंवा परतावा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी तसे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठवले आहे. 

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांच्या मासिक पासच्या कालावधीत वाढ करावी किंवा परतावा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी तसे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठवले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईच्या टोलनाक्यांवर पुन्हा वाहनांची तुफान गर्दी!

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जगदीश ओझा यांनीही ही मागणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात 22 मार्चला पहिला लॉकडाऊन जाहीर केला. त्यात 14 एप्रिलला तीन आठवडे वाढ करण्यात आली. त्यानुसार 3 मेपर्यंत लोकल व लांब पल्ल्याची रेल्वेसेवा बंद राहील. 

ही बातमी वाचली का? ...झाले असे काही की, मुंबईकर पुरते पाण्यात! 

रेल्वे बंद असल्यामुळे मासिक किंवा त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने उपनगरी रेल्वेप्रवाशांना लॉकडाऊनच्या कालावधीतील पासच्या भाड्याचा परतावा द्यावा किंवा मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भट्ट यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP demands railway minister for extension or refund of local pass