esakal | मुंबईच्या टोलनाक्यांवर वाहनांची पुन्हा तुफान गर्दी!
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या टोलनाक्यांवर पुन्हा वाहनांची तुफान गर्दी!

लॉकडाऊनचे नियम सोमवारपासून (ता. 20) शिथिल करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील टोलनाके पुन्हा सुरू झाले असून, वाहनांच्या मोठ्या रांगल्याचे दृश्‍य सर्वत्र दिसत होते. 

मुंबईच्या टोलनाक्यांवर वाहनांची पुन्हा तुफान गर्दी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनचे नियम सोमवारपासून (ता. 20) शिथिल करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील टोलनाके पुन्हा सुरू झाले असून, वाहनांच्या मोठ्या रांगल्याचे दृश्‍य सर्वत्र दिसत होते. 

ही बातमी वाचली का? ...झाले असे काही की, मुंबईकर पुरते पाण्यात! 

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार काही प्रमाणात मार्गावर आणण्यासाठी 20 एप्रिलपासून काही कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बंद ठेवण्यात आलेले टोलनाके सोमवारी पुन्हा सुरू झाले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच अत्यावश्‍यक सेवा वगळता देशभरातील टोलनाक्‍यांसह सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. सोमवारपासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाक्‍यांवर वसुली सुरू झाली आहे. याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 17 एप्रिलला जारी केले. त्यानुसार देशभरातील टोलनाक्‍यांवर खासगी व व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरू झाली आहे. 

ही बातमी वाचली का? म्हणून खासगी रुग्णालयांना आहे कोरोनाचा धोका

मुलुंड, वाशी, ऐरोली या टोलनाक्‍यांवर सकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंत्रालय, बॅंका, अन्य आस्थापना, शेअर बाजार आदी ठिकाणांकडे दुचाकी, चारचाकी वाहनांतून जाणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसले. मुलुंड टोलनाक्‍यावर ठाण्याहून आलेल्या वाहनांची गर्दी झाली होती. 

ही बातमी वाचली का? पालिका म्हणते! वाजवा रे वाजवा, पण परवानगी घेऊन...

चालकांची चौकशी 
टोलनाक्‍यावर खबरदारी म्हणून पोलिस वाहनचालकांची चौकशी करत होते. सरकारने घालून दिलेल्या अटींमध्ये बसत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडले जात होते. मंत्रालयात 10 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.