देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray

माजी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडे केली विशेष मागणी

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले...

मुंबई: राज्यातील सर्व पत्रकार व कॅमेरामन (Journalists) यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स (Frontline Workers) घोषित करून लसीकरणात (Vaccination) प्राधान्य द्यावे, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. देशात विविध माध्यमांचे पत्रकार आहेत. सुमारे 12 राज्यांत या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र हा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना या संदर्भात सातत्याने मागणी (Demand) करत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेतसुद्धा (Second Wave) या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपोआपच लसीकरणात प्राधान्य मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. (BJP Devendra Fadnavis letter to CM Uddhav Thackeray demands Journalists should be treated as Frontline workers for Vaccination)

हेही वाचा: संविधान संपवण्याचं काम मोदी सरकार करतंय- नाना पटोले

"कोरोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यातसुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार मौन का?, हे अनाकलनीय आहे", असं ते म्हणाले.

हेही वाचा: "सर्वोच्च न्यायालयाने समांतर केंद्र सरकारही बनवावं"

"कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्या प्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करतच काम करावे लागते. या संदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Web Title: Bjp Devendra Fadnavis Letter To Cm Uddhav Thackeray Demands Journalists Should Be Treated As Frontline Workers For

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top