
"आणखी किती काळ आमच्याच नेत्यांवर टीका करून राजकारण करणार?"
"सर्वोच्च न्यायालयाने समांतर केंद्र सरकारही बनवावं"
मुंबई: सध्या देशात कोरोनाचे (Coronavirus) आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. काही राज्यांमध्ये (States) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला असला, तरी काही राज्यांमध्ये ही लाट (Covid Second Wave) आता अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राष्ट्रीय लॉकडाउन (National Lockdown) करावं, अशी मागणी विरोधी पक्षांकडून (Opposition) केली जात आहे. देशातील विविध राज्यातील हायकोर्टांनी (High Court) केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सडकून टीका केली. (Supreme Court should form parallel National Government says Congress Nana Patole)
हेही वाचा: आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का
"कोविडचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यालायलाने टास्क फोर्स बनवण्याचे आदेश दिले आहे. पण मला असं वाटतं की केवळ टास्क फोर्सच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला समांतर असे एक केंद्र सरकारदेखील सर्वोच्च न्यायालयाने तयार करावं. कारण मोदींचे सरकार लोकांना कोविडपासून वाचवण्यासाठी असमर्थ ठरताना दिसत आहे. संविधानमध्ये अशी तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे", असं मत त्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा: घाबरलो...खचलो... पण सावरलोही, परिचारिकांची वर्षभर रूग्ण सेवा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्यावर एका पत्राद्वारे टीका केली. 'आपल्याच पक्षाचे काही मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते कोरोनाच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल करत आहे', असं पत्रात नमूद करण्यात आलं होतं. "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे राहुल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात बोलले. मला भाजपला असा प्रश्न विचारायचा आहे की आमच्या नेत्यांवर टीका करून तुम्ही आणखी किती काळ राजकारण करत राहणार आहात? केंद्रातील सरकार २० हजार कोटी रूपये सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी खर्च करत आहेत, पण गरजेचे असलेल्या लसीकरणासाठी मात्र निधीची तरतूद करत नाहीत", असा टोला त्यांनी लगावला.
Web Title: Supreme Court Should Form Parallel National Government Says Congress Nana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..