

Ambernath BJP Flag Controversy
ESakal
अंबरनाथ : पूर्वेतील वडवली परिसरात राष्ट्रध्वजासाठी उभारलेल्या अधिकृत ध्वजस्तंभावर एका पक्षाचा ध्वज लावल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मनोज फलके यांनी केला आहे. संबंधित पक्षध्वज हटवून राष्ट्रध्वज फडकवावा आणि याप्रकरणी जबाबदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी फलके यांनी शुक्रवार (ता. ७) पासून अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.