Vidhan Sabha 2019 : वडिलांसाठी मुलाने घेतली माघार; गणेश नाईकांना भाजपची उमेदवारी

Ganesh Naik
Ganesh Naik
Updated on

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांना अखेर भाजपकडून ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासाठी त्यांचा मुलगा संदीप नाईक याला माघार घ्यावी लागली आहे. 

नवी मुंबईच्या राजकारणातील हा एक मोठा बदल असल्याचे बोलले जात आहे. वडिलांसाठी मुलाला माघार घ्यावी लागली आहे. गणेश नाईक हे ऐरोलीमधून निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने त्यांना एबी फॉर्मही दिला. पुत्र संदीप नाईकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. 

ऐरोली मतदार संघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती पण संदीप नाईकांऐवजी गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने पहिल्या उमेदवार यादीत डावलल्यानंतर नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यामुळे गणेश नाईक भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com