esakal | राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालंय; भाजप नेत्यांचा दावा 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp has 55 mla support letter from ncp says girish mahajan

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालंय; भाजप नेत्यांचा दावा 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता नेत्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला असल्याचा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ट्विट आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला दावा यातून मोठा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. 

बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

सह्यांचे पत्र मिळाल्याचा दावा
शपथविधीनंतर भाजप नेते गिरीष महाजन यांनी मीडियाशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दोन पक्ष एकत्र आले आहेत, असा दावा महाजन यांनी यावेळी केला. गिरीष महाजन म्हणाले, 'राज्यात इतर पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असतील तर आम्ही सरकार स्थापन केले तर काय चुकले. मुळात आम्ही शिवसेनेसोबत निवडणूक लढवली होती. पण, शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी सुरुवातीपासून राष्ट्रवादी सोबत चर्चा केली. त्यानंतर काँग्रेससोबत चर्चा सुरू केली. आता आम्ही सरकार स्थापन केले आहे. जनतेनं जो कौल दिला होता. त्यानुसारच आम्ही सरकार स्थापन केले आहे.' अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. त्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले असल्याचा दावा गिरीष महाजन यांनी या वेळी केला. 

'राऊत यांनी शहाणे व्हावे'
महाजन म्हणाले, 'राज्याने महायुतीच्या बाजूने कौल दिला असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपचा विश्वासाघात केला. राऊत यांच्या मुळे शिवसेनेचे नुकसान झाले आहे. आता तरी त्यांनी शहाणे व्हावे. राऊत फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असा दावा करत होती. आता तरी उद्धव ठाकरे यांना कळेल की, राऊत यांच्यामुळे आपले किती नुकसान झाले.'

आणखी बातम्या वाचा

ताज्या बातम्या

मु्ख्य बातम्या