

BJP
esakal
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्रित निवडणुका लढवण्याच्या आणाभाका घेत असली तरी प्रत्यक्षात मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गड असणाऱ्या महापालिका आणि जिल्हापरिषदांशिवाय भाजप या दोन्ही पक्षांशिवाय निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. यापुढचा काळात कुबड्यांशिवाय निवडणूका लढवण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपला दिल्याने त्याचा प्रत्यय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासूनच पाहता येणार आहे.