esakal | "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना दरमहा ५ हजार भत्ता द्या"
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Local

"लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

sakal_logo
By
विराज भागवत

भाजपच्या केशव उपाध्ये यांनी मांडली सर्वसामान्य मुंबईकरांची व्यथा

मुंबई: राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तात्काळ परवानगी द्यावी. जर ते शक्य होत नसेल तर सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवास भत्त्याच्या अनुषंगाने महिन्याला ५ हजार रुपये द्या, द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांच्या आर्थिक अडचणी मांडल्या. (BJP Keshav Upadhye says Either start Mumbai Local for all or give 5 thousand per month as travel fund)

हेही वाचा: धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेस येताच आईने दोन वर्षाच्या मुलीसह मारली उडी

केशव उपाध्ये म्हणाले, "राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे."

हेही वाचा: "तर त्याच मशालीने विमानतळ जाळून टाकू"; उद्धव ठाकरेंना इशारा

"मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीव नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरीय रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे. लस खरेदीसाठी राज्य सरकारने सहा-सात हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा", असेही केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केले.

loading image