esakal | यंदाच्या दंहीहंडी संदर्भात भाजपनेते राम कदम यांची मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले ते... 
sakal

बोलून बातमी शोधा

ram kadam

सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

यंदाच्या दंहीहंडी संदर्भात भाजपनेते राम कदम यांची मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले ते... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून केले जात आहे. 

भूमिगत मेट्रो 3 चे काम झपाट्याने; अनेक स्थानकांच्या छतांचे काम प्रगतीपथाकडे....​

अशातच मुंबईतही सर्वांत प्रसिद्ध उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दहीहंडी. मात्र कोरोनाचं सावट लक्षात घेता गणेशोत्सवा पाठोपाठच दहीहंडी उत्सव रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय येण्याआधी भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडीला होणारी मोठी गर्दी पाहता त्यांनी हा निर्णय जाहीर केला. 

बीकेसी रुग्णालयाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात! कंत्राटदाराला 40 टक्के अधिक दर दिल्याचा गंभीर आरोप; वाचा बातमी​

राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. मुंबई ठाण्यामध्ये काही मोठ्या दहीहंड्यांचे आयोजित केले जात असते. घाटकोपर परिसरात राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. तसंच अनेक पथकं या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंनी जनसमुदाय रस्त्यावर उतरतो. यामुळेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला होणारी हजारो लोकांची गर्दी लक्षात घेता घाटकोपला होणारी देशातील सर्वांत मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे', असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम; वाचा बातमी​

घाटकोपरमध्ये राम कदम यांची दहीहंडी खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडचे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या ठिकाणी सेलिब्रिटींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गेल्यावर्षीही राम कदम यांनी दहीहंडी उत्सव रद्द केला होता. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात अनेकांचे प्राण देखील गेले होते. त्यामुळे  राम कदम यांनी दहीहंडीचा उत्सव रद्द करत त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता.

loading image