esakal | भूमिगत मेट्रो 3 चे काम झपाट्याने; अनेक स्थानकांच्या छतांचे काम प्रगतीपथाकडे....
sakal

बोलून बातमी शोधा

marol naka metro

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो-3 मार्गिकेवरील 26 मेट्रो स्थानकांच्या बांधकामाला वेग आला आहे. या भुयारी मार्गिकेतील मेट्रो स्थानकांच्या छतांचे सरासरी 27 टक्के काम पूर्ण झालेले आहे.

भूमिगत मेट्रो 3 चे काम झपाट्याने; अनेक स्थानकांच्या छतांचे काम प्रगतीपथाकडे....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो-3 मार्गिकेवरील 26 मेट्रो स्थानकांच्या बांधकामाला वेग आला आहे. या भुयारी मार्गिकेतील मेट्रो स्थानकांच्या छतांचे सरासरी 27 टक्के काम पूर्ण झालेले आहे. 26 स्थानकांमधील सात स्थानकांचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) देण्यात आली.

मोठी बातमी : ...म्हणून सुशांत होता प्रचंड तणावात ? तीन दिवसांपूर्वीच नोकरांना म्हणाला....

कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यान तयार होत असलेली 33 किमी लांबीची भूमिगत मेट्रो मार्गिका दोन टप्यांमध्ये सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. आरे कॉलनी ते बीकेसी या पहिल्या टप्प्यामध्ये डिसेंबर 2021 मध्ये आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ या संपूर्ण मार्गिकेवर जून 2022 पर्यंत मेट्रो सुरू करण्याची योजना एमएमआरसीने आखली आहे. एमएमआरसीएलमार्फत लवकरच आरे ते बीकेसी दरम्यानच्या मार्गिकेवर रूळ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या कामासाठी लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो लिमिटेड (एल एॅण्ड टी कंस्ट्रक्शन) या कंपनीसोबत करार केला आहे. यानुसार कंपनीला डिझाईन, खरेदी, आपूर्ती, रूळ टाकणे, परीक्षण करणे अशी कामे करावी लागणार आहेत. 

लॉकडाऊनमुळे मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम; वाचा बातमी​

तसेच लॉकडॉऊनच्या कालावधीत ही एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे काम 77 टक्के आणि विधानभवन स्थानकाचे काम 72.60 टक्के झाले आहे. तर सीप्झ, मरोळ नाका, आंतरदेशीय विमानतळ, सांताक्रुझ, शीतलादेवी, सीएसएमटी आणि सिद्धिविनायक स्थानकांचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे . तर मान्सूनदरम्यान सीप्झ स्थानकाच्या छताचे काम 65 टक्के, विमानतळ टी 2 स्थानकाच्या छताचे काम 30 टक्के तर मरोल नाका व विधान भवन स्थानकांच्या छतांचे काम प्रत्येकी 73 टक्के, मुंबई सेंट्रल 51 टक्के , वरळी 69 टक्के, धारावी 76 टक्के कामे पूर्ण झालेले आहे. मेट्रो 3 या संपूर्ण मार्गिकेवरील स्थानकांच्या छतांचे 27 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.

बीकेसी रुग्णालयाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात! कंत्राटदाराला 40 टक्के अधिक दर दिल्याचा गंभीर आरोप; वाचा बातमी​

28 बोगदे तयार
33 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गिकेवर एकूण 32 बोगदे तयार होत आहेत. टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) सहाय्याने 32 पैकी 28 बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जमिनीवरून खाली 28 मीटर मार्गिकेच्या बांधकामासाठी सतरा टीबीएमचा वापर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 83 टक्के भुयारीकरणाचे काम झाले असून काही महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे एमएमआरसीएलचे लक्ष्य आहे.