मनसे - भाजप जवळ येतायत ? वाचा काय आहे घडामोड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा ट्रॅक धरत राजकारण करण्याचा निर्णय घेतलाय. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळेल. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या ९ तारखेला पाकिस्तानातून  आणि बांगलादेशातून आलेल्या नागरिकांना हाकलून देण्यासाठी रॅलीचं आयोजन केलंय. या रॅलीसंदर्भातील तयारीला वेग आलेला पहायला मिळतोय. अशातच आता राज ठाकरे काढत असलेल्या रॅलीला भारतीय जनता पक्ष मदत करणार का ? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. 

मोठी बातमी - भाजपाला मोठं खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मेगाप्लान.

मिळालेल्या माहितीच्या आधारे काल संध्याकाळी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात तब्ब्ल एक तास चर्चा झाली. दरम्यान राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ९ तारखेला होणाऱ्या रॅलीबाबत चर्चा  झाल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावरून एकमेकांच्या जवळ येताना पाहायला मिळतेय. काल संध्याकाळी सात वाजता आशिष शेलार कृष्णकुंजवर दाखल झालेले.   

मोठी बातमी -​ मराठीत शिकलेत म्हणून नाकारली नोकरी..

राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केल्यानंतर भाजपने या मोर्चाचं स्वागत केलंय. केंद्राने केलेला कायदा याला पूरक अशीच मनसेची भूमिका पाहायला मिळतेय. दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला भाजपकडून मदत केली जाईल असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेट झालेली महाराष्ट्राने पाहिलंय. 

bjp leader ashish shelar and mns chief raj thackeray met in krushnakunja 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader ashish shelar and mns chief raj thackeray met in krushnakunja