
नाट्यगृहांमधील बंद झालेली बालनाट्ये आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर होत आहेत, अशी बोचरी टीका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई ः आरेमध्ये कारशेड करण्यासाठी सर्व बाबी अनुकूल असूनही ती कारशेड कांजूरमार्ग ला नेण्याचा प्रयोग केवळ बालहट्टाचा प्रयोग होता. आजकाल बालनाट्ये बंद आहेत, नाट्यगृहांमधील बंद झालेली बालनाट्ये आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर होत आहेत, अशी बोचरी टीका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मेट्रोबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना त्यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. आता जैसे थे आदेशामुळे मेट्रो प्रकल्पाला उशीर होईल व त्याच्या खर्चातही वाढ होईल. तसेच महाग झालेला हा प्रकल्प मुंबईकरांवर आणखीनच जास्त तिकिटाचे ओझे टाकणारा होईल, अशी भीतीही शेलार यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेलार यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित केला आहे. उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने राज्य सरकारला चपराक लगावली ते अपेक्षितच होते. राज्य सरकारने मिठागर आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही, खासगी जमिनीवरील मालकांचे प्रलंबित दावे विचारात घेतले नाहीत. या बाबी आम्ही आधीपासूनच सांगत होतो, पण ते न ऐकल्यामुळे राजकीय दबावापोटी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले आदेश मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
कांजूरमार्गला आरेचा चांगला पर्याय होता, तेथील जागा मोकळी करण्याचे नव्वद टक्के काम झाले होते, सर्वोच्च न्यायालयानेही संमती दिली होती. तरीही ही कारशेड तेथून कांजूरमार्गला नेण्याचा प्रयोग हा केवळ बालहट्टाचा प्रयोग होता, अशी टीकाही शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे. आजकाल बालनाट्ये बंद आहेत, नाट्यगृहांमधील बंद झालेली बालनाट्ये आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर होत आहेत, अशी खरमरीत टीकाही शेलार यांनी केली आहे.
कांजूर कारशेड प्रकरणः राज्य सरकारचा निर्णय काहींच्या जिव्हारी लागला,अजित पवारांची प्रतिक्रिया
घटनात्मक यंत्रणा कोलमडली - साटम
आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारला जोरदार चपराक आहे. मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरमार्ग ला न्यायचा निर्णय म्हणजे, नो मेट्रो प्रपोजल, आहे हा आम्ही तेव्हा दिलेला इशारा आता खरा ठरतो आहे. न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारविरोधात दिलेले अनेक निर्णय हे राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याचेच प्रतिबिंब आहे, अशी टीका अंधेरीचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.
BJP leader Ashish Shelar criticizes Aditya Thackeray
-------------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )