कांजूर कारशेड प्रकरणः राज्य सरकारचा निर्णय काहींच्या जिव्हारी लागला,अजित पवारांची प्रतिक्रिया

कांजूर कारशेड प्रकरणः राज्य सरकारचा निर्णय काहींच्या जिव्हारी लागला,अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः  कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. 

केंद्र आणि राज्य सरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. मी कधीही विकासकामात राजकारण आणले नाही, मी उलट मदतच करत असतो, असाही टोला त्यांनी लगावला. 

दोन वर्षांपूर्वी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजूरमार्गची मिठागर पट्यातील ही जमीन एमएमआरडीएला दिली होती. यावरील 102 एकर जमिनीवर मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारकडून आज उच्च न्यायालयात या भूमिकेला विरोध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायद्याच्या कक्षेत नसल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी अतिरिक्त सौलिसीटर जनरल अनील सिंह यांनी केली. राज्य सरकारच्या मेट्रो कारशेडच्या बांधण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका केंद्राकडून मिठ आयुक्तांनी केली आहे. मिठागरे आमच्या मालकाची आहेत असा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात पवार यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. 

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय आणि विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील
काम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल असेही अजित पवार म्हणाले.

माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात पवारसाहेबांची 50-55 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी 30 वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत आहे, मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

Deputy cm ajit pawar reaction Bombay HC stays Kanjurmarg metro car shed project

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com