esakal | मुंबई: व्हेंटिलेटर्स रूग्णालयात पडून; डॉक्टर्सना प्रशिक्षणच नाही...

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Ventilators
मुंबई: व्हेंटिलेटर्स रूग्णालयात पडून; डॉक्टर्सना प्रशिक्षणच नाही...
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात वाढत असलेल्या कोरोनामुळे (Coronavirus) अनेक नवनव्या वैद्यकीय गोष्टी लोकांना समजू लागल्या आहेत. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील डॉक्टर्सदेखील नवं तंत्रज्ञान वापरण्याच्या कला अवगत करत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील काही रूग्णालयांमध्ये मात्र अजूनही काही व्हेंटिलेटर्स बंद पडून आहेत. हे व्हेंटिलेटर्स (Ventilators) नादुरूस्त असल्याने बंद आहेत अशी बाब नाही. सध्या कार्यरत असलेले डॉक्टर्स हे एमबीबीएस पदवीधर नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर्स कशापद्धतीने वापरायचे, याचं त्यांना प्रशिक्षणच देण्यात आलेलं नाही, असं वृत्त टीओआयने दिलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (BJP Leader Atul Bhatkhalkar Attacks on Uddhav Thackeray Govt over Unused Ventilators)

हेही वाचा: लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

भातखळकर यांनी एका वृत्तापत्राचं कात्रण ट्विट केलंय. त्या फोटोसोबतच त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. "अननुभवी MBBS डॉक्टर्सना प्रशिक्षित करण्याची कोणतीही व्यवस्था वसुलीबाज आणि बेपर्वा ठाकरे सरकारने उभी केलेली नसल्यामुळे केंद्र सरकारने पाठवलेले शेकडो व्हेंटिलेटर्स वापराशिवाय अक्षरशः धूळखात पडले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत...", अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा: शाब्बास मुंबईकर! रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

दरम्यान, मुंबईतील एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. 'अनेकदा ऑक्सिजन सॅच्युरेशन ७० टक्के असलेले रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते. अशा रूग्णांची काळजी कशी घ्यावी याचं प्रशिक्षण आम्हाला दिलं होतं. पण केंद्र सरकारने राज्य सरकारला काही व्हेंटिलेटर्स दिले आहेत. डॉक्टर्स सेंटरमध्ये सध्या २५ व्हेंटिलेटर्स आणि तितकीचे हाय फ्लो नेसल क्लिप्स आहेत. पण ही उपकरणे अद्याप वापरात नाहीत. अनेक महिने ही उपकरणं धूळ खात पडली आहेत. कारण डॉक्टर्स सेंटरमधील कोणालाही ती उपकरणं कशी वापरायची याचं प्रशिक्षणच देण्यात आलेलं नाही", अशी माहिती त्या डॉक्टरने सांगितली.