''संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की, मुख्यमंत्री राठोडांच्या खिशात''

कृष्ण जोशी
Thursday, 4 March 2021

संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतरही तो राज्यपालांकडे न पाठविल्याबद्दल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे.

मुंबई:  पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतरही तो राज्यपालांकडे न पाठविल्याबद्दल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. यावरून मुख्यमंत्री खोटारडे आहेत हेच सिद्ध होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

भाजपच्या जबरदस्त टीकेनंतर अखेर विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र बुधवारपर्यंत तो अजूनही राज्यपालांकडे पाठविण्यात आला नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वरील टीका करणारा व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. 

राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे न गेल्यामुळे आता मुद्दा एवढाच आहे की संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत की राठोड यांच्या खिशात मुख्यमंत्री आहेत, हा एकच प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राजीनामा राज्यपालांकडे न जाणे याचा अर्थ मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा धडधडीतपणे खोटे बोलत आहेत आणि ते खोटारडे आहेत, हेच यावरून सिद्ध होत आहे, असाही टोला भातखळकर यांनी लगावला आहे. एवढे खोटे बोलणाऱ्या आणि महिलांविषयी असंवेदनशीलता प्रकट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पक्षातर्फे निषेध करण्यात येत आहे. हा प्रश्न विधीमंडळातही उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा- अधिवेशनचा आज चौथा दिवस, संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत विरोधक विचारणार जाब

मुळात पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर १८ दिवसांनी राठोड यांचा राजीनामा घेणे ही उशिरा केलेली कृती आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यापूर्वीच केली होती.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader Atul Bhatkhalkar sharply criticized Chief Minister for sanjay rathod


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Atul Bhatkhalkar sharply criticized Chief Minister for sanjay rathod