"सातच्या आत घरात'च्या उदंड चर्चेनंतर..."; भाजपचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून उडवली खिल्ली

"सातच्या आत घरात'च्या उदंड चर्चेनंतर..."; भाजपचा टोला

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रभाव गेल्या दोन महिन्यात हळूहळू कमी होताना दिसत आहे. मार्च महिन्यात दिवसाला ५० ते ६० हजाराच्या घरात नवे रूग्ण आढळत होते. आता ही संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात (Maharashtra) करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) हे चित्र असल्याचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेतेमंडळी सांगत आहेत. मात्र, या साऱ्या गोंधळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे घरी बसून एका ठिकाणाहून काम करणे विरोधकांना (Opposition) रूचत नसल्याचं दिसतंय. चार दिवसांपूर्वी राज्याला तौक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसला. कोकणाचे त्यात सर्वाधिक नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन तासांचा दौरा (Tour) करण्याचे जाहीर केले आणि त्याप्रमाणे नुकसानग्रस्त (Damage) गावांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपने त्यांची खिल्ली उडवली. (BJP Leader Atul Bhatkhalkar slams CM Uddhav Thackeray over Konkan Tour)

हेही वाचा: सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ

कोरोनाचा प्रसार वाढत असताना राज्यात संध्याकाळी सातनंतर सर्व काही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वैद्यकीय सेवा वगळता सारं बंद राहिल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. त्यावेळी भाजप आणि मनसेने सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आज बऱ्याच कालावधीने पाहणी दौऱ्यावर गेले. पण नुकसानीची पाहणी अवघ्या तीन तासात शक्य नाही अशी भावना व्यक्त करणाऱ्या भाजपच्या आमदाराने ठाकरे यांना ट्विटरवरून टोला लगावला. "पुलावरून हात दाखवून सातच्या आत घरात... च्या उदंड चर्चेनंतर आजच आले आहे, 'कोकण दौरा आटोपून तीन तासात घरात...", अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.

दरम्यान, तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे तीन तासांच्या कोकण दौऱ्यावर आले. त्या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. कमी कालावधीच्या दौऱ्याचे फलित काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. यावर, उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. 'मी या दौऱ्यावर दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही', असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

loading image
go to top