Karjat Deforestation: 'टोरंट' वृक्षतोडीवर नाराज, भाजप नेत्याचा पक्षाला रामराम

Torrent Tree Cutting: 'टोरंट'शी संबंधित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजपमधील ऋषिकेश जोशी आणि मिनेश मसने यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
bjp party

bjp party

sakal

Updated on: 

कर्जत : तालुक्यातील टोरंट कंपनीच्या सायडोंगर जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता सत्ताधारी भाजपमधूनही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीचा मुद्दा उपस्थित करत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. त्यांच्यासोबत मिनेश मसने यांनीही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे टोरंट प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता राजकीय वर्तुळातूनही नवे बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...