

K. Annamalai controversial statement on Mumbai
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उत्तर प्रदेश, बिहार यांसह इतर राज्यांतील नेत्यांना प्रचारात आणून अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तमिळनाडूतील भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४७ येथे प्रचार केला. त्या वेळी त्यांनी ‘मुंबईचा उल्लेख बॉम्बे’ असा करून ‘मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही,’ असे वादग्रस्त विधान केले. या विधानावरून राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.