विरोधीपक्ष हास्यास्पद विधान करून जोक मारतात; किरीट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP leader Kirit Somaiya criticism opposition party NCP MP supriya sule

विरोधीपक्ष हास्यास्पद विधान करून जोक मारतात; किरीट सोमय्या

डोंबिवली - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकदा महाराष्ट्रात फिरले की राज्यात सत्ताबदल होतो असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खोचक टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, काही काही वेळा हसण्यासाठी विरोधी पक्ष चांगले जोक करतात असे बोलून हसून यावर अधिक बोलणे टाळले.

डोंबिवली भाजपाचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वतीने सावळाराम क्रीडासंकुल येथे नमो रमो या गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सोमय्या यांनी उत्तर देत विरोधी पक्षाच्या फटकारले.

ते पुढे म्हणाले, एनसीपीच्या नेत्यांना चैन पडत नाही. सत्ता म्हणजे फक्त पैसे मोजायचं काम. परंतु यावेळी हे जे भ्रष्टाचारी लोकांना दूर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने लोकशाही आणि विकासाच्या दृष्टीने पुढे चालला आहे. त्यांना शेखचिल्ली चे स्वप्न बघू द्या असेही बोल सोमय्या यांनी लागवले.

तसेच अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट वरून पुन्हा एकदा हल्लाबोल करत सोमय्या म्हणाले, विजया दशमीच्या दिवशी जे भ्रष्टाचारी सरकार होतं, त्यांचं दापोलीला जे ग्रीन स्ट्रीट रिसोर्ट आहे. ते भस्मासित करून आम्ही रावण दहन करणार एवढे विश्वास पूर्वक सांगतो असे विधान केले.

काही दिवसांपासून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यावर ते म्हणाले, बदल्यांच्या ट्रान्सफरमध्ये जे तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च केले होते. आता ते राज्य संपले आहे आता प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा आणि जे पोलीस अधिकारी पुन्हा एकदा तीच माफियागिरी आता संजय पांडे कुठे आहे ते लक्षात ठेवा आणि लोकांच्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्या स्वतःचा बँक अकाउंट काही काळ विसरा.