esakal | उद्धव ठाकरे हे कोकणात पिकनिकला गेले होते? - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Narayan Rane

उद्धव ठाकरे हे कोकणात पिकनिकला गेले होते? - नारायण राणे

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे कोकणात पिकनिकला गेले होते ? लोकांना का नाही भेटले ते? अजून पॅकेज जाहीर केलेले नाही. सरकारच्या तिजोरीत देण्यासारखे काही नाहीय" अशी टीका खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे (narayan rane) यांनी केली आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर (kokan tour) नारायण राणेंनी बोचरी टीका केली आहे. (Bjp leader mp narayan rane slam cm uddhav thackeray over his kokan tour)

"कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये हे सरकार पैसे खातंय. प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी उघड करणार. भ्रष्टाचाराने माखलेले हे सरकार आहे" अशी टीका नारायण राणेंनी केली. "मंत्रालय, वर्षा व मातोश्री इथं भुताटकी आहे. तिथं शांती घाला" असेही राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आमदारकीसाठी जी नाव पाठवली आहेत, ती नावे ठराविक वेळेतच मंजूर करण्याचे बंधन राज्यपालांवर नाही, असे राणे यांनी सांगितले.

हेही वाचा: मोठी बातमी: मविआमध्ये मतभेद, काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार?

"मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरे आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, त्यांच्या मनात नव्हतं" असं राणे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर असताना शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीवर राणे म्हणाले की, "उदय सामंत पक्षात समाधानी नसतील म्हणून ते भेटले असतील. कुणीही आले तरी स्वागत करेन." लवकरच सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मागे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासहीत समोर आणेन. कोरोनाच्या नावाखाली टक्केवारी वाढली आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला.