
राऊतांच्या पत्रकार परिषदेवर मुनगंटीवार म्हणाले, ‘खोदा पहाड निकला...’
मुंबई : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, आज ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. आमची कितीही चौकशी केली तरी काहीही निघणार नाही. ज्या बाळासाहेबांना भुजबळांनी आत टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेत आहेत; असा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे. (BJP Leader Sudhir Mungantiwar On Sanjay Raut Press Conference)
संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही खोदा पहाड निकला छोटा... चुहा अशी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप मोठा पक्ष आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रात फक्त 56 जागा आहेत. यापूर्वी कलमाडी, ए राजा यांच्यावरही ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. तपास यंत्रणांचा आताच दबाव वाटतो का? असा प्रश्नही सुधीर मनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राऊतांना विचारला आहे.
हेही वाचा: 'बिल्लीने आज फिर....', राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृतांचं खोचक ट्विट
काय म्हणाले होते संजय राऊत
काही दिवसांपूर्वीच राऊत यांच्या मुलीचे लग्न झाले. ED चे लोक या लग्नाच्या खर्चाच्या हिशोब घेण्यासाठी हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले होते. किती पैसे दिले अशी विचारणा केली, असे राऊत यांनी सांगितले. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच झालं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट उभारला होता. त्यात जे कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. ते ईडीला दिसलं नाही का? असा दाखला देत संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता.
हेही वाचा: ...तर सोमय्यांना जोड्याने मारू; बंगल्यांच्या आरोपावर राऊतांचं चॅलेंज
राऊत यांच्या यावक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय भाजप नेते प्रवीण दरेकर यांनही प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, तुमच्या लग्नापर्यंत पोहोचलात म्हणून तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या घरच्या लग्नापर्यंत पोहोचलात, असे म्हणत राऊतांवर पलटवार केला होता.
Web Title: Bjp Leader Sudhir Mungantiwar On Sanjay Raut Press Conference
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..