गणेश नाईकांना आणखी एक हादरा; नवी मुंबईतील दोन माजी नगरसेवकांची घर वापसी

गणेश नाईकांना आणखी एक हादरा; नवी मुंबईतील दोन माजी नगरसेवकांची घर वापसी

नवी मुंबई  : ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांपैकी आणखी दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे. पक्षावरील निष्ठा दाखवत माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे. आज मुंबईत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 

वैभव गायकवाड हे गेले दोन वर्षे वाशीतून निवडून येत आहेत. याआधी दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकीटवरून ते आणि त्यांची पत्नी दिव्या गायकवाड निवडून आले आहेत. नाईक गटातील सुशिक्षित आणि अभ्यासू नागरसेवकांपैकी एक म्हणून या दोन्ही नगरसेवक पती-पत्नीला ओळखले जाते. महापालिकेतील काही विकासाच्या प्रस्तवावावर गायकवाड दाम्पत्य नाईकांसमोर उभे राहिल्याचे चित्र अनेकांनी पाहिले आहे. विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गायकवाड दाम्पत्य त्यांच्या पाठीशी उभे होते. मात्र नियमबाह्य काम करणाऱ्या ज्या विकासकविरोधात गायकवाड यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. त्याच विकासकाला वाचवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्यामुळे गायकवाड यांनी नाराजी व्यक्ती केली होती. गायकवाड यांनी अचानक नाईकांची साथ सोडल्याने नाईक गटाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गायकवाड यांचा त्यांच्या प्रभागात असणारा दांडगा जनसंपर्क पाहता आत्तापासूनच त्यांचा विजय मानला जात आहे. याआधी तुर्भेतील चार नगरसेवक, त्यानंतर अलीकडेच दिघ्यातील तीन नगरसेवक त्यानंतर या दोन नगरसेवकांनी नाईकांना सोडचिट्ठी दिल्यामुळे नाईकांचा नवी मुंबईतील गडाचे बुरुज हळूहळू ढासळू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गायकवाड यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतल्याने वाशीत भाजपला विजय मिळवणे आता कठीण असल्याचे मानले जात आहे. आपण याआधीपासून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. मात्र काही वेळा आमच्या मार्गात सोबत असणाऱ्या नेते मंडळींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे मागे न पडता आता अधिक उमेदीने यापुढेही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सांगितले.

BJP leaders from Navi Mumbai join NCP

---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com