चंद्रकांत पाटील का म्हणतायत, "नाथाभाऊंनी आम्हाला दोन थोबाडीत माराव्या"

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

“देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचे सविस्तर बोलणे झाले आहे. जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो” - चंद्रकांत पाटील 

मुंबई : “नाथाभाऊ आमचे वडील आहेत, त्यांनी आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत माराव्या, पण त्यांनी घरची भांडणं जगासमोर आणू नयेत”, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले,“नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचे सविस्तर बोलणे झाले आहे. जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेत 'हे' आदेश

“नाथाभाऊ हे मुरलेले हुशार राजकारणी आहेत. ते बुडत्या जहाजात बसणार नाहीत. काँग्रेसने त्यांना ऑफर दिली तर मग पहिली सीट का नाही दिली? त्यांनी सहाव्या जागेची का ऑफर दिली? “, असा सवाल पाटील यांनी केला.

“नाथाभाऊंना पक्षाकडून खूप मिळाले आहे. अजून मिळायला पाहिजे होते. पण मिळाले नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत, नाथाभाऊचे समाधान झाले की नाही माहित नाही. पण त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये ही अंबाबाई चरणी प्रार्थना, कुटुंबात भांडणे होतात तशी पक्षातही होतात, ती संपतात”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

bjp maharashtra internal conflict chandrakant patil about eknath khadase


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp maharashtra internal conflict chandrakant patil about eknath khadase