esakal | मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेत 'हे' आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेत 'हे' आदेश

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने सांगत नसून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला आदेश देतोय की घराघरात जा. तिथल्या ५० वर्षावरील व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी शिबीरे लावा. - उद्धव ठाकरे 

मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेत 'हे' आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मी राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने सांगत नसून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला आदेश देतोय की घराघरात जा.तेथेली ५० वर्षावरील व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी शिबीरे लावा. त्यांच्या शाखेत नोंदी ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाईसाठी शिवसैनिक मुंबईत उतरले आहेत.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून देशपातळीवर विचार केला तर राज्यात सर्वत जास्त रूग्ण आहेत. राज्यात मुंबईत सर्वात जास्त रूग्ण आहेत. या आव्हानाचा सामना करताना सरकारी यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. असे असले तरीही ही साथ आटोक्यात आली नाही. यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे.

हेही वाचा: आर्थिक राजधानी मुंबईसाठी वेगळं पॅकेज जाहीर करा..शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी..

ठाकरे यांनी शाखाप्रमुख यांची व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत मीटिंग घेतली. त्यामध्ये  सर्व उपशाखाप्रमुख शिवसैनिकांना गटप्रमुख या सर्वांना कोरोनासाठी प्रभागांमध्ये कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपण ज्या इमारतीमध्ये, चाळींमध्ये अथवा झिपडपट्टी भागात राहत असलेल्या वय वर्ष ५० यावरील नागरिकांची नोंद करावी. त्यांना मधुमेह रक्तदाबाचा श्वासाचा त्रास होत असेल अशांची नावे लिहून शाखेत जमा  करावं, तसेच साठीच्या वरील नागरिकांची वेगळी यादी तयार करावी हे सर्व करत असताना स्वतःची व आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी या कार्यकर्त्यांना मधुमेह रक्तदाब व इतर काही त्रास असल्यास त्यांनी स्वतःची काळजी घेऊन घरीच राहावे.

हेही वाचा:घरपोच मद्य विक्रीसाठी सरकारचा पुन्हा नवीन निर्णय..वाचा काय झालाय बदल.. 

यासाठी प्रत्येक वार्डात कोविड सर्वेक्षण सुरू केले आहे. मराठी, इंग्रजी भाषेत नागरिकांची ऑनलाईन माहिती गोळा करण्याचं काम सुरू झाले आहे. त्यासाठी आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत.

या मोहिमेत शिवसेनेचे मुंबईतील आमदार, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख हे पदाधिकारी, माहिला पदाधिकारी, युवा सेना अधिकारी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

make list of people who are above 50 udhhav thackeray gave orders to shivsainik read full story