भाजप राममंदिर बनविणार का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

दहिसर - भाजप सरकार राममंदिर उभारणार का असा थेट सवाल शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला केला. रविवारी (ता. ८) मागाठण्यात झालेल्या उत्तर भारतीय सन्मान संमेलनात ते बोलत होते. 

दहिसर - भाजप सरकार राममंदिर उभारणार का असा थेट सवाल शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला केला. रविवारी (ता. ८) मागाठण्यात झालेल्या उत्तर भारतीय सन्मान संमेलनात ते बोलत होते. 

आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेने मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि सहा लोकसभा मतदारसंघांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिवसेनेने उत्तर भारतीयांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला रविवारी मागाठण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघातून सुरुवात झाली. कांदिवली पूर्वेकडील भूमी व्हॅली समोरील खेळाच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. या वेळी सुभाष देसाई यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक आघाडीवर होते, असे स्पष्ट करत आताचे केंद्र सरकार त्या जागेवर राममंदिर बांधणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला. लोकप्रियता घसरत असल्याने भाजपला एनडीएची आठवण होत असल्याची टीका त्यांनी केली. भूमिपुत्रांचा हक्क प्रथम असून मेहनत करणाऱ्या उत्तर भारतीयांचेही स्वागत केले पाहिजे, असे मत देसाई यांनी व्यक्त केले. मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्तर भारतीयांचा या वेळी सत्कार केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP make Ram temple -subhash desai