esakal | शरद पवारांच्या मातोश्रीवरील बैठकांवरून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या मातोश्रीवरील बैठकांवरून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, म्हणालेत...

एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आणि दुसरीकडे महाराष्ट्रात संवेदनशील परिस्थितीत सातत्याने सुरु असलेलं राजकारण. दोन्ही गोष्टी अजिबात थांबण्याचं नाव नाही.

शरद पवारांच्या मातोश्रीवरील बैठकांवरून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं, म्हणालेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आणि दुसरीकडे महाराष्ट्रात संवेदनशील परिस्थितीत सातत्याने सुरु असलेलं राजकारण. दोन्ही गोष्टी अजिबात थांबण्याचं नाव नाही. यातील राजकारणाबाबत बोलायचं झालं तर आता याला कारण ठरलंय ते म्हणजे भाजप नेते आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून लागवलेल्या सणसणीत टोल्याचं 

गेले काही दिवस आपण शरद पवार यांना मातोश्रीवर जाताना पाहतोय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही महत्त्वाच्या बैठक झाल्यात. याचं  पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विटरवरून भाष्य केलंय.   

VIDEO : रोबोट 'गोलर' रुग्णांच्या सेवेत दाखल; कोरोना योद्धांची जोखीम कमी होणार

काय म्हणालेत भाजप आमदार आशिष शेलार 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना टोला हाणत आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. यामध्ये ते म्हणतात, कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी... आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो... त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे! 

मोठी बातमी हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' भागात डोअर-टू-डोअर स्क्रिनिंग 'फेल'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर जावं लागतं,  यावर आशिष शेलार यांनी बोट ठेवलंय. 

bjp mal ashish shelar pokes cm uddhav thackeray over sharad pawars matoshree meeting

loading image