हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' भागात डोअर-टू-डोअर स्क्रिनिंग 'फेल'

हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' भागात डोअर-टू-डोअर स्क्रिनिंग 'फेल'
Updated on

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. सुरुवातीला धारावी, वरळी हे दोन भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र आता मालाड यासारखा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेनं या भागातील रुग्ण शोधून काढण्यासाठी डोअर-टू-डोअर स्क्रिनिंग योजना राबवली. या भागातील दाट लोकवस्ती असलेल्या मालवणी, मालाड पश्चिमेत ही योजना राबवली गेली. मात्र ही योजना फेल ठरल्याचं समोर आलं आहे.

स्थानिक रहिवासी प्रशासनाच्या टीमला सहकार्य करत नसल्याचं आढळून आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशासनानं नियुक्त केलेले स्वयंसेवक झोपडपट्टीमधल्या नागरिकांमध्ये केवळ कोविड-१९ संबंधित लक्षणांची तपासणी करायची का अशी विचारणा करायचे. त्यानंतर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही की हे स्वयंसेवक पुढच्या घरात जायचे. 

जेव्हा कोणत्याही भागात हे पथक भेट देणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोविड-१९ च्या स्क्रिनिंग पासून बचाव करण्यासाठी काही नागरिक बाजारात जाण्याच्या बहाण्यानं घरं बंद करुन बाजारात जाताना दिसायचे. मालवणी या भागात दाट लोकवस्ती आहे. येथे झोपडपट्टी भाग आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित मोठ्या संख्येनं आढळल्यानं प्रशासनानं या येथे तपासणी सुरुच ठेवली आहे. मात्र अंबोजवाडीत स्थानिकांनी सहकार्य न केल्यानं पथक माघारी फिरलं.

हे पथक temperature guns , ऑक्सिमीटर आणि रहिवाश्यांचा तपशील सांगण्यासाठी एक नोंद वही घेऊन सज्ज आहेत. मात्र मालवणीच्या झोपडपट्टी भागात दिवसभर फिरूनही या पथकाचा डेली लॉग पूर्ण भरु शकला नाही.

बरेच स्थानिक रहिवासी हे  क्वांरटाईन होण्यासाठी घाबरत असून क्वांरटाईन सेंटरमधील स्वच्छतेबाबत त्यांना मोठी समस्या असल्याचं समोर आलं आहे.क्वांरटाईन सेंटरमधील वॉशरुम, हॉस्पिटलचे बेडची स्थिती भयावह असते हे त्यांनी काही माध्यमांद्वारे पाहिले. त्यामुळे रहिवाशांचं म्हणणं आहे की, क्वांरटाईन सेंटरमध्ये किंवा कोणत्यातरी वेगळ्या प्रभागांमध्ये दाखल केल्यास आम्ही आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com