मुंबई महापालिकेसाठी भाजपचा 'मराठी कट्टा'; शिवसेनेला देणार शह!

एक ऑक्टोबरपासून सुरु होणार कट्टा
BJP_BMC
BJP_BMC

मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली असून शिवसेना भाजपसाठी मुख्य टार्गेट असणार आहे. म्हणूनच शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आता 'मराठी कट्टा' ही नवी संकल्पना राबवणार आहे. आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे भाजपनं याची जबाबदारी सोपवली आहे. एक ऑक्टोबरपासून या कट्ट्याला सुरुवात होणार आहे.

BJP_BMC
"५० लाखांसाठी एवढा त्रास, तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येईल"

भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विविध वॉर्डमध्ये अशा पद्धतीच्या मराठी कट्ट्याचं आयोजन करण्यात येणार आहे. जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे अशा जास्तीत जास्त मराठी पॉकेट्समध्ये या कट्टयाचं आयोजन केलं जाणार आहे.

BJP_BMC
पहिल्यांदा राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली - निलेश राणे

या कट्ट्यावर राज्यातील भाजप नेते मंगलप्रभात लोढा, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रातील काही मंत्रीही या कट्ट्यावर येऊन मराठी लोकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये विशेषतः भाजप सरकारनं आत्तापर्यंत जी काम केली आहेत, ती पोहोचवण्याच काम केलं जाणार आहे. तसेच शिवसेनेनं आजवर मुंबई महापालिकेत अनेक वर्ष राज्य केलंलं असतानाही अद्यापही ज्या कमतरता राहिल्यात आहेत त्या देखील मराठी जनतेसमोर आणण्याचं काम भाजपकडून केलं जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com