मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांना सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची मुंबई भाजपची योजना बैठकीला सुरूवात आजपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाली.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांना सुरूवात

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची मुंबई भाजपची योजना बैठकीला सुरूवात आजपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाली. बैठकीला मुंबईतील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री सहभागी झाले आहेत.  या बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाशजी यांनीही मार्गदर्शन केले.  

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर विजयी होणार! आमचं ठरलंय...!! असा निर्धार मुंबई भाजपकडून करण्यात आला. याआधी विधानसभा निहाय शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकाही पार पडलेल्या आहेत. नुकतीच एक बैठक वांद्रे पश्चिम येथे पार पडली. 

मुंबई जिंकायला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत असे संकेत भाजपकडून याआधीच देण्यात आले आहेत. मुंबईकरांना बदल हवाय, मुंबईकरांच ठरलय असे कॕम्पेन सध्या भाजपकडून चालविण्यात येत आहे. यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे. भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे! असाही प्रचार भाजपकडून पालिका निवडणूकीच्या तोंडावर सुरू झाला आहे.  

Web Title: Bjp Meetings For Mumbai Municipal Elections Begin Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..