esakal | 'अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा'

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
'अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. या भीषण अग्नि दुर्घटनेत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे कोविड रुग्णालय असून ICU मध्ये एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. या अग्नि दुर्घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही नॅशनल न्यूज नसल्याचे सांगितले.

राजेश टोपे यांच्या या विधानावर विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "हा राष्ट्रीय मुद्दा नाही असं राजेश टोपे यांनी म्हणणं म्हणजे ही असंवेदनशीलता आहे. ते कुठल्या मानसिकतेत म्हणाले हे मला माहित नाही. अशी प्रतिक्रिया देण अयोग्य आहे" असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: राजेश टोपेंना घरी बसवा..!! भाजप नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

कांदिवलीतील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा राजेश टोपे यांच्या विधानाचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? अशा शब्दात टोपेंच्या विधानावर भातखळकरांनी टि्वटरवरुन संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

राजेश टोपे काय म्हणाले?

या अग्नि दुर्घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही नॅशनल न्यूज नसल्याचे सांगितले. "राज्य सरकार आणि महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाखांची अशी १० लाखांची मदत जाहीर करु, असे त्यांनी सांगितले. नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेच्या धर्तीवरच रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणार आहोत" असे त्यांनी जाहीर केले.

"रुग्णालयाचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यकच आहे. जर ते करण्यात कुचराई झाली असेल, तर सक्तीने कारवाई करु. १० दिवसात या घटनेचा चौकशी अहवाल सादर होईल. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करु, या दुर्देवी घटनेत ज्या रुग्णांनी प्राण गमावलाय, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत" असे राजेश टोपे म्हणाले.