"ती गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?", भाजपचा सवाल

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालाडच्या कोविड सेंटरच्या कार्यक्रमात कोरोनाविषयी एक वक्तव्य केलं.
No-Social-Distancing
No-Social-DistancingSocial-Media

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालाडच्या कोविड सेंटरच्या कार्यक्रमात कोरोनाविषयी एक वक्तव्य केलं.

मुंबई: मालाडमध्ये (Malad) जंबो कोविड सेंटरचे (Jumbo Covid Care Center) लोकार्पण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आरोग्य यंत्रणांवर (Medical Services) ताण असूनही राज्याने कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) थोपवली. आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने रस्त्यांवर पुन्हा गर्दी (Crowd) होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल माहिती नाही. पण गर्दी वाढत गेली तर दुसरीच लाट पुन्हा आपल्यावर उलटेल...". मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याला भाजपच्या अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) सडेतोड उत्तर दिले. (BJP MLA Atul Bhatkhalkar slams CM Uddhav Thackeray over Covid Lockdown Restrictions)

No-Social-Distancing
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

राज्यात दोन आठवडे लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने पुन्हा हे निर्बंध लागू केले. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या रोजीरोटीवर होत असल्याचे वास्तव समोर दिसत असूनही या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यास राज्य सरकारवर तयार नाही. तशातच सोमवारी मालाडमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात कोविडच्या दुसऱ्या लाटेची भीती उपस्थितांना दाखवली. याच मुद्द्यावरून भाजपचे अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली. "तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?", असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

No-Social-Distancing
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर?

३१ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, आदित्य ठाकरे, मंत्री नवाब मलिक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रोचा कार्यक्रम झाला. मेट्रोला या मान्यवरांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मेट्रो 2A आणि Line7 च्या मार्गावरील ट्रायल रनला सुरूवात झाली. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे बडे नेते आणि इतर पदाधिकारी यांना कोरोनाबद्दलचे नियम, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. त्याबद्दलचे काही व्हिडीओ आणि फोटोही तेव्हा व्हायरल झाले होते.

याच मुद्द्याची आठवण करून देत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, सातत्याने वाढत जाणाऱ्या लॉकडाउनमुळे आता जनमानसातही असंतोष असून एके दिवशी त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे अशी भावना दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com