Court
sakal
अलिबाग/नवी मुंबई : उरणमध्ये १६ वर्षांपूर्वी तरुणाला बेदम मारहाण, पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. झटे यांनी आज निकाल सुनावला. भाजप आमदार महेश बालदी, उरणचे नगरसेवक गणेश पाटील, तसेच सुनील पेडणेकर आणि प्रवीण पेडणेकर या चौघांना दोषी ठरवत न्यायालयाने कमाल तीन वर्षे सक्तमजुरी आणि एकूण ६९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.