भाजपच्या 'या' खासदाराकडून कोरोना योद्धांना एक ग्रॅम सोनं देऊन सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवीन रुग्णांचा आकडा समोर येतो. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार यांनी या कोरोना योद्धांचा सत्कार केला आहे. 

भाजप मुंबई (उत्तर)चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 30 कोविड-19 योद्धांचा सत्कार केला आहे. कोरोना सारख्या संकटकाळात ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली अशा योद्धांना त्यांनी प्रत्येकी 1 ग्रॅम सोनं आणि 5 हजार रुपयांची रोख रक्कम दिली आहे.

BIG NEWSमास्क, सॅनिटायझरला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले; त्यामुळे काय होणार घ्या जाणून...

कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या काळात या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर, पोलिस कर्मचारी, नर्स यांनी बरीच मेहनत घेतली. मात्र याव्यतिरिक्त सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी पडद्यामागे राहून आपली सेवा बजावली आहे. 

बोरिवलीतील सॅट्रा पार्क सीएचएस येथे आयोजित कार्यक्रमात शेट्टी यांनी सोसायटीमध्ये स्वतःहून 12 खाटांच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. 

BIG NEWSमुंबई महापालिकेच्या एका चुकीमुळे तब्बल 'इतके' फेरीवाले आले अडचणीत; 'या' योजनेला मुकणार..   

बीएमसीने या प्रस्तावावर सहमती दर्शविली याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि बरीच गृहनिर्माण संस्था त्यांच्या आवारात अशी केंद्रे विकसित करण्यासाठी पुढे येत असल्याचंही शेट्टी यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी भाजपाचे स्थानिक आमदार सुनील राणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

जैन अध्यात्मिक नेते नाममुनी महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने कांदिवली पश्चिम येथील पवन धाम येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात शेट्टी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसंच नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या बोरीवली आणि दहिसर उपनगरातील खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमधील विविध कोविड केअर सेंटरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यासाठीही शेट्टी यांनी मदत केली आहे.

BJP MP gopal shetty gave one gram gold coin to covid yoddhas as a symbol of gratitude


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP gopal shetty gave one gram gold coin to covid yoddhas as a symbol of gratitude