

BJP's Master Plan: Retaining Mumbai’s Marathi Roots
sakal
मुंबई : मुंबई ही केवळ स्वप्नांची नगरी नाही, तर ती इथल्या 'मराठी माणसाच्या' घामातून उभी राहिलेली नगरी आहे. मात्र, गेल्या काही दशकांपासून वाढते शहरीकरण आणि गगनाला भिडलेले घरांचे भाव यामुळे मुंबईचा मूळ रहिवासी, विशेषतः मराठी माणूस शहराच्या परिघाबाहेर फेकला जात असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. अशा कठीण प्रसंगात, राज्यातील महायुती सरकारने, विशेषतः भारतीय जनता पक्षाने 'मुंबईचा मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे' हा संकल्प केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे. वरळीचा बीडीडी चाळ पुनर्विकास असो किंवा धारावीचा कायापालट, या सर्व प्रकल्पांच्या केंद्रस्थानी 'भूमीपुत्रांचे हित' दिसून येत आहे.