भाजप मुंबईच्या महापौरांविरोधात अविश्वास ठराव मांडणार?

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासूनच भाजपनं अविश्वास ठराव मांडण्याची भाजपनं सुरु केली होती.

मुंबईः  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजप या एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सुरु आहे. त्यात आता पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासूनच भाजपनं अविश्वास ठराव मांडण्याची भाजपनं सुरु केली होती.

मुंबई महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित केली जावी, याबाबतची मागणी भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, ही मागणी मान्य न करता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यात भाजपनं महापौरांना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात सभागृहाची तातडीनं बैठक बोलवावी असं म्हटलं आहे.  भाजपनं मुंबईमध्ये कोरोनाच्या संकट काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन भाजप किशोरी पेडणेकरांविरोधात अविश्वास ठराव मांडू शकतात. भाजपनं याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चाही केली आहे. 

मुंबईकरांचे  हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 

bjp no confidence motion against mumbai mayor kishori pednekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp no confidence motion against mumbai mayor kishori pednekar