Kulgaon-Badlapur Municipal Council
ESakal
मुंबई
Thane: बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणी नवा ट्विस्ट, भाजपने दिला मुस्लिम उमेदवार; दंगलीचे गुन्हे असल्याचा आरोप
Kulgaon-Badlapur Municipal Council: भाजपने कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद मुस्लिम समाजातील शागोफ गोरे यांना दिले आहे. यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडली असली, तरी त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष अडचणीत सापडले आहेत. शिवसेनेकडून हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत असतानाच, भाजपने यापूर्वी तुषार आपटे यांना दिलेल्या स्वीकृत नगरसेवक पदावरून राज्यभर टीका झाली होती.

