esakal | महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार, प्रसाद लाडांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

prasad lad

महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार, प्रसाद लाडांचा आरोप

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाला असून काळ्या यादीत (Black List) टाकलेल्या कंपनीला जादा दराने काम देण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal singh chahal) यांच्याकडे तक्रार केली असून यात गुंतलेल्या संबंधितांवर कारवाई करावी व निविदा रद्द करून पालिकेचे व पर्यायाने जनतेचे चौदा हजार कोटी रुपये वाचवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. ( BJP Prasad Lad Complaint Against BMC Corruption to Commissioner Iqbal Singh chahal-nss91)

हेही वाचा: राज्य सरकारच्या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळात असंतोष - नरेश दहिबावकर

वांद्रे येथील 360 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याचा आराखडा, बांधकाम, परिचालन आणि दुरुस्तीच्या पंधरा वर्षांच्या कंत्राटाची ही निविदा आहे. नियम व संकेतांचा भंग करून मे. लार्सन अँड टुब्रो ला हे कंत्राट देण्यात आल्याचा लाड यांचा आरोप आहे.

मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने त्यांच्या मोनोरोल प्रकल्पामधून ‘मे लार्सन अँड टुब्रो’ला काढून टाकत त्यांच्याकडून 184 कोटी रुपयांची बँक गॅरेंटी वसूल केली होती. ही कंपनी प्रकल्प राबविण्यास अयशस्वी ठरली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले. मात्र एमएमआरडीएच्या या कारवाईनंतरही बृहन्मुंबई महानगर पालिकेने ‘मे लार्सन अँड टुब्रो’ला निविदा दिली आहे. वीस हजार कोटी रुपयांच्या कामासाठी चौतीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून नियमांचा भंग तर होतोच आहे पण पालिकेचा करोडो रुपयांचा तोटाही होणार आहे.” असेही लाड यांनी म्हणले आहे. ज्या सल्लागार संस्थेने या कामासाठी चौदा हजार कोटी रुपये वाढवण्याचा सल्ला दिला तिचीही चौकशी करावी. या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार पाहता ही निविदा रद्द करावी व संबंधितांवर सुयोग्य कारवाई करावी,” असेही लाड यांनी म्हटले आहे.

loading image