esakal | राज्य सरकारच्या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळात असंतोष - नरेश दहिबावकर
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati festival

राज्य सरकारच्या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळात असंतोष - नरेश दहिबावकर

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे यावर्षीही गणेशोत्सव (Ganpati Festival) साधेपणाने साजरा करावा, सजावट भपकेबाज नसावी, गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त नसावी, अशी नियमावली राज्य सरकारने (State Government) जाहीर केली. या नियमावली विरोधात गणेश मंडळांनी निराशा व्यक्त केली. सरकारने गणेश मंडळांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय (Decision) घेतला. मात्र, या नियमावलीबाबत पुनर्विचार केला जाणार असून गणेशोत्सवाचे निर्बंध शिथिल करणे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच (CM Uddhav Thackeray) हाती आहे. ( CM Uddhav Thackeray Lockdown Unlock process waiting for decision says Naresh dahibavkar-nss91)

राज्य सरकारकडून जून महिन्याच्या अखेरीस सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या. यामध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना गणेश मंडळांना दिल्या आहेत. सार्वजनिक उत्सवासाठी महापालिका-पोलिस आदींची संमती घेणे अनिवार्य आहे. महापालिका तसेच स्थानिक धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप टाकावेत, सजावट भपकेबाज नसावी, सार्वजनिक मूर्तींची उंची जास्तीत जास्त चार फूट तर घरगुती मूर्तींची उंची दोन फुटांपेक्षा जास्त असू नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक, स्वच्छताविषयी जनजागृती उपक्रम आयोजित करावेत, असेही पत्रकात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Mumbai Train: आवाज नाही उठविला तर, उपासमारीची वेळ येणार

सरकारने जाहिर केलेल्या या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळ व मूर्तीकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ही नियमावली जाहिर करण्याअगोदर गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऎकून घ्यायला हवे होते. मात्र, तसे न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतला. त्यानंतर गणेश मंडळांनी महापौर किशोरी पेडणेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. गणेश मंडळांनी नियमावली विरोधात रोष व्यक्त केला. या भेटीत गणेशोत्सवाचे निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला देण्यात आले.

राज्य सरकारने जाहिर केलेल्या नियमावलीमुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळात अंसतोष माजला आहे. सरकारने गणेश मूर्ती 4 फूटांपेक्षा जास्त नसावी, मंडप व्यवस्था याबाबत लादलेल्या निर्बंधात शिथिलता आणावी. तर, ऑनलाईन दर्शन, आरोग्य सुविधेबाबत दिलेल्या नियमांचे स्वागत गणेश मंडळांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत मूर्तिकार व गणेशोत्सव मंडळे आहेत.

- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

loading image