esakal | "सरकारची केवळ घरात बसूनच घोषणाबाजी पण भाजप मात्र..."
sakal

बोलून बातमी शोधा

pravin-darekar-Uddhav-T

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सणसणीत टोला

"सरकारची केवळ घरात बसूनच घोषणाबाजी पण भाजप मात्र..."

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोनाचं संकट आहे. मुंबईसह राज्यभरात रूग्णवाढीचा वेग कमी झाला असला, तरी राज्यात दररोज नव्या रूग्णांची भरत पडतच आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार केवळ घरात बसून घोषणा देत आहे पण भाजपचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून काम करीत आहेत आणि आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. जोगेश्वरी तसेच नवी मुंबईतील उलवे येथे भारतीय जनता पक्षातर्फे उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा: नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं - आशिष शेलार

"कोरोनाच्या वाढत्या फैलावातही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यात कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता असल्याने या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत. परंतु राज्य सरकार केवळ घोषणा देण्याचे काम करीत आहे", अशी खरमरीत टीका दरेकर यांनी केली. "एका बाजूला सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मात्र आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कोरोना संकटकाळात गोरगरिबांसाठी, आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे", असे ते म्हणाले.

हेही वाचा: "एकट्या मोदींना हे झेपणार नाही"; नवाब मलिकांचे टीकास्त्र

"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरून अनेक जिल्ह्यात स्वतः जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत आहेत. भाजपा लोकप्रतिनिधींकडून रुग्णांना मदत म्हणून अनेक कोविड सेंटर उभारली जात आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावती येथे जाऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेमधील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत तेथील आयुक्तांशी चर्चा करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काल पालघर येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी करून अनेक बाबींची दखल आम्ही घेतली. 'सरकार' म्हणून ज्यांनी जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यकता होती. ते घरात बसले असले तरी ते काम देवेंद्र फडणवीस कर्तव्य भावनेतून करीत आहेत. भाजपा या संकटकाळात जनतेच्या पाठीशी कायम राहील", असा विश्वास दरेकरांनी म्हणाले.

loading image
go to top