esakal | नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं - आशिष शेलार
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले-आशिष शेलार

'माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी'

नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं - आशिष शेलार

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. रेमडेसिव्हीरच्या काळ्याबाजाराला केंद्र सरकार जबाबदार आहे, या नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी आशिष शेलार यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, "नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही." 'माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद' अशी टीका शेलार यांनी केली. (bjp mla Ashish shelar slam maharashtra congress president nana patole)

तीन लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन पडून आहेत, त्याबद्दल नाना पटोले बोलले आहेत, याकडे पत्रकारांनी शेलारांचे लक्ष वेधले, त्यावर त्यांनी मी माहिती घेऊन बोलेन असे उत्तर दिले. केंद्र सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे कोरोना वाढतो आहे, मृत्यु वाढत आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. "स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडता येणार नाही. नाना पटोलेंनी हातसफाई करु नये" असे शेलार म्हणाले.

हेही वाचा: परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालकांचा नकार

अदर पुनावाल प्रकरणावर म्हणाले

"मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर माझं शीर कापलं जाईल" असं खळबळजनक विधान सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी लंडनच्या 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. या संदर्भात आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. (bjp mla Ashish shelar slam maharashtra congress president nana patole)

हेही वाचा: चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर

त्यावर ते बोलताना म्हणाले की, "अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे."

"केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे असे शेलार म्हणाले. "या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं" असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

loading image