

Kalyan-Dombivli Records BJP’s First Political Success with Unopposed Corporators
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रभावी सुरुवात करत डोंबिवलीत दोन जागांवर बिनविरोध विजय नोंदवला आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक २६-क मधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन द्वारे संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले आहे. या निकालामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांत भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.