

Dombivli Protest
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदानावरील सुरू असलेल्या कामाच्या विरोधात रविवारी खेळाडू, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. गेल्या अनेक दशकांपासून हजारो खेळाडूंच्या सरावाचे केंद्र राहिलेल्या या मैदानाचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करत मैदान खेळाडूंसाठीच राखीव ठेवावे, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.