यशवंत जाधव यांच्या ध्वनीफितीवरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध; कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप

समीर सुर्वे
Wednesday, 2 December 2020

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे.

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे. जाधव यांनी तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर माझ्याकडेही चार ध्वनीफिती असून कंत्राटदाराचा बोलवता धनी कोण, हे योग्य वेळी जाहीर करू, असे सांगत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपकडे बोट दाखवले. 

हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

यश कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला. या धमकीची कथित ध्वनीफीत त्यांनी जारी केली आहे. तसेच पोलिस आणि महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करून संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुध्द रंगले आहे. "मुलूंडमध्ये काम करणारा कंत्राटदार थेट भायखळ्यात कसा येतो, त्यावरुन त्याचा उद्देश काय हे स्पष्ट होते, ज्या कंत्राटदाराशी संबंध नाही, त्याला धमकावण्याचा प्रश्‍न नाही. या ध्वनीफितीचा बोलवता धनी कोण, याचा लवकरच पर्दाफाश करू. माझ्या जवळही चार ध्वनीफित आहेत', असेही जाधव यांनी नमुद केले.

दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता

मुलूंडमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तेथे सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. त्यामुळे जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेही यात संधी साधून जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जाधव यांनी राजीनामा देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. 

BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording