
BJP
esakal
मुंबई : सांगोला-पंढरपूर परिसरातील बंद पडलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी तसेच विद्याविकास मंडळ संस्थांमधील तब्बल कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांबाबत माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करा, अशी जोरदार मागणी भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांसह विविध यंत्रणांकडे सुमारे ८०० हून अधिक पानांचे पुरावे जोडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे साळुंखेंवर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.