esakal | "एक तरुण नेता CBI समोर स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं समजतंय"
sakal

बोलून बातमी शोधा

"एक तरुण नेता CBI समोर स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं समजतंय"

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी दिल्लीतील CBI अधिकाऱ्यांचं तपास पथक काल मुंबईत दाखल झालंय

"एक तरुण नेता CBI समोर स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं समजतंय"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी दिल्लीतील CBI अधिकाऱ्यांचं तपास पथक काल मुंबईत दाखल झालंय. CBI ने या प्रकरणात नव्याने तपासणी देखील सुरु केलीये. CBI कडून विविध टीम्स बनवून या प्रकरणाचा तपास सुरु झालाय.

एकीकडे या प्रकरणाचा तपास आता CBI मार्फत सुरु झालाय. पण सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून जोरदार राजकारणही रंगताना पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्यांकडून एक 'मोठं' ट्विट करण्यात आलंय. 
 
महाराष्ट्रातील एक मोठा नेता, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात स्वतःहून CBI पुढे चौकशीसाठी जाणार असं भाजप प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी म्हटलंय. सुरेश नाखुआ यांची भाजपचे ट्विटर योद्धा म्हणूनही ओळख आहे.

मोठी बातमी - गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसा पाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सुरेश नाखुआ यांनी ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती सर्वांसमोर आलीये. नाखुआ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,

"एका अत्यंत विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळतेय की, एक तरुण नेता केंद्रीय तपास यंत्रणेसमोर (CBI समोर ) चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळतेय. हा एक मोठ्या पब्लिक रिलेशन म्हणजेच PR स्ट्रॅटेजीचा भाग आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सुरेश नाखुआ यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट केलं गेलंय. या ट्विटनंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. 

BJP spokesperson suresh nakhua on sushant singh rajputs CBI investigation

loading image
go to top